Pune Attack : ही दिल्ली नाही पुणे आहे…; तरुणाने रस्त्यात तरुणीवर वार करताच स्थानिक धावले अन् अनर्थ टळला!

Pune Attack : ही दिल्ली नाही पुणे आहे…; तरुणाने रस्त्यात तरुणीवर वार करताच स्थानिक धावले अन् अनर्थ टळला!

Pune Crime News: हातात कोयता घेऊन आरोपी तरुण हा तरुणीचा पाठलाग करत होता. इतक्यात या परिसरात असलेल्या स्थानिकांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेतला

पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आज पुन्हा एकदा शहरात भररस्त्यात एक धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने बाईकवर असणाऱ्या तरुणीवर कोयत्यावर वार केले. मात्र स्थानिक तरुणांनी मोठ्या धाडसाने हल्लेखोर विकृत तरुणाला पकडलं आणि तरुणीचा जीव थोडक्यात वाचला. काही दिवसांपूर्वी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही भररस्त्यात एका तरुणीवर निर्घृणपणे रस्त्यात वार करण्यात आले होते. तिथं उपस्थित असलेल्या जमावाने आरोपीला रोखण्याचं धाडस न दाखवल्याने त्या तरुणीचा मृत्यू झाला होता. मात्र पुण्यात दोन तरुणांनी जीवावर उदार होत तरुणीचे प्राण वाचवल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

हेसुद्धा : वाचाकोल्हापूर हादरलं! प्रसिद्ध उद्योगपतीने पत्नी अन् मुलाची हत्या करुन स्वतःला संपवलं समोर आलं धक्कादायक कारण

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सदाशिव पेठ भागात आज सकाळी १० वाजण्यास सुमारास एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. ही तरुणी आणि एका तरुणासोबत दुचाकीवरून सदाशिव पेठ भागातल्या स्वाद हॉटेलच्या परिसरात आली होती. त्याठिकाणी ते दोघे एकमेकांशी बोलत बोलत असताना शंतनू जाधव हा तरुण तिथं आला आणि त्याने बागेतून कोयता काढत दुचाकीवर असणाऱ्या तरुण-तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दुचाकीवरील तरुण आपला जीव वाचवत तिथून पळून गेला आणि शंतनू जाधव याने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

Leave a Comment