Kolhapur News : कोल्हापूर हादरलं! प्रसिद्ध उद्योगपतीने पत्नी अन् मुलाची हत्या करुन स्वतःला संपवलं समोर आलं धक्कादायक कारण

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं! प्रसिद्ध उद्योगपतीने पत्नी अन् मुलाची हत्या करुन स्वतःला संपवलं समोर आलं धक्कादायक कारण

Kolhapur News : कोल्हापुरातल्या गठठलेल्या प्रकारामुळे एकच उठली आहे. उद्योगपतीच्या आईने शेजारच्या मदतीने बेडरुमचा दरवाजा उघडला तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गडहिंग्लजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडहिंग्लजमधील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांनी पनी आणि मुलाची हत्या करून आपण स्वतः आमहत्या केलीय. बलात्काराच्या आरोपातून व्यथित झाल्याने संतोष शिंदे यांनी आपले जीवन संपविल्याची माहिती मिळत आहे. बलात्काराच्या आरोपातून शिंदे एक महिना तुरुंगामध्ये होते. याच तणावातून संतोष शिंदे यांनी आधी पत्नी आणि मुलाचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर उद्योगपती संतोष शिंदे यांनी स्वता विष पिऊन आणि त्यानंतर गळा चिरून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.

गडहिंग्लज पोलिसांनी या संदर्भात अद्याप कोणतेही माहिती दिली नसून पोलीस पोलीस अधिक तपास करत आहेत. सकाळी बेडरूमचा दरवाजा उघडला नाही म्हणून आईने शेजाराच्या मदतीने दरवाजा खोलल्यानंतर संतोष शिंदे यांनी जीवन संपविल्याचे समोर आलं. संतोष शिंदे यांचे गडहिंग्लज आणि त्याचबरोबर सकेश्वर परिसरात मोठा उद्योग व्यवसाय आहे… या उद्योगांमध्ये जवळपास 500 हून अधिक कामगार कामावर आहेत. त्यामुळे गडहिंग्लज परिसरात खळबळ उडाली आहे.

हेसुद्धा वाचा : Ahmednagar News: फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार

Leave a Comment