Ahmednagar News: फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार

Ahmednagar News: फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार

आरोपी शिक्षकाने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आष्टी येथील लॉजवर अत्याचार केले.

विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. अहमदनगरच्या जामखेड शहरात ही घटना घडली आहे. आरोपी शिक्षकाने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आष्टी येथील लॉजवर अत्याचार केले.

शिक्षकाने आपल्याच शाळेतीत शिकत आसलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थीनीला शाळेचा अभ्यास असल्याचं सांगून तिच्याशी सॅपचॅटवरुन संपर्क केला. यावरुन तिच्याशी अश्लिल बोलू लागला. तिला अर्धनग्न फोटो पाठवण्यासाठी सांगू लागला. हे फोटो त्याच्या हाती लागताच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली

आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्यथा मारून टाका”; LES दर्शना पवारच्या आईची संतप्त प्रतिक्रि

या घटनेमुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याची चर्चा नगरमध्ये रंगली आहे. पालकांनी या घटनेनंतर शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला आहे. राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर आसे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी या शिक्षकास अटक करून श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत। पोलीस कोठडीत सुनावली आहे.

Leave a Comment