Viral Video: तुम्हीसुद्धा ‘खारे वाटाणे’ आवडीनं खाताय? मग हा व्हिडीओ पाहून चुकूनही हात लावणार नाही

Viral Video: तुम्हीसुद्धा ‘खारे वाटाणे’ आवडीनं खाताय? मग हा व्हिडीओ पाहून चुकूनही हात लावणार नाही

सर्वांनाच बाहेरच्या चटपटीत गोष्टी खायला खूप आवडतात. लहानपणापासून खात आलेले कुरमुरीत पदार्थ अजूनही काहीजण आवडीनं खातात.

सर्वांनाच बाहेरच्या चटपटीत गोष्टी खायला खूप आवडतात. लहानपणापासून खात आलेले कुरमुरीत पदार्थ अजूनही काहीजण आवडीनं खातात. यामध्ये अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश आहे. यातील एक म्हणजे खारे वाटाणे हा कुरुमुरीत पदार्थ अनेकजण अजूनही खातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रवासादरम्यान खाण्यासाठी सर्रास खारे वाटाणे घेतले जातात. मात्र हा आवडीनं खाल्ला जाणारा पदार्थ बनतो कसा हे तुम्हाला माहितीय का? खारे वाटाणे बनवतानाचा व्हिडीओ सध्या समोर आलाय. जो सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवत आहे.

खारे वाटाणे मेकिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही कदाचित खाण्यासाठी पुन्हा खारे वाटाणे विकत घेणार नाही. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. पांढऱ्या वाटाण्यांवर हिरवा रंग ओतला जात आहे. या रंगाच्या सहाय्याने पांढऱ्या वाटाण्यांना हिरवं केलं जातंय. कामगारांनी काम करताना हातमोजे घातलेले नाहीयेत. डोक्यामध्ये काही घातलेलं नाहीये. हे पाहूनच तुम्हाला परत खाण्याची इच्छा होणार नाही.

फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार

Leave a Comment