‘वर्तमान कोसळलं पण इतिहास उभा आहे’, महाभयंकर पुरातही पा रोवून उभ्या असलेल्या मंदिराचा व्हिडीओ व्हायरल

‘वर्तमान कोसळलं पण इतिहास उभा आहे’, महाभयंकर पुरातही पा रोवून उभ्या असलेल्या मंदिराचा व्हिडीओ व्हायरल

Heavy Rainfall Video: आत्ताच्या इंजिनियर्सनं या जुन्या बांधकामांमधून काहीतरी शिकावं असा सल्ला दिला जात आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.

देशभरात सध्या मुसळधार पावसानं धुमाकूळ घतला आहे. उत्तराखंड, चंदिगढ़, पंजाब, दिल्ली या भागात तर अक्षरश: पूर येतायेत. मोठमोठ्या गाड्या, झाडं, माणसं अहो, एवढंच नाही तर मोठमोठ्या इमारतींचा सुद्धा पालापाचोळा होताना दिसत आहे. अलिकडेच बांधलेल्या या इमारती पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका व्हिडीओनं मात्र सर्वांनचंच लक्ष वेधून घेतलंय. एकीकडे अद्ययावत ईमारती वाहून जात असताना दुसरीकडे मात्र प्राचिन मंदीरं जागीचं उभी राहून पाण्याशी मुकाबला करत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी जुन्या बांधकामाचं कौतुक करत आहेत. आत्ताच्या इंजिनियर्सनं या जुन्या बांधकामांमधून काहीतरी शिकावं असा सल्ला दिला जात आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल

हा व्हिडीओ @BattaKashmiri या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ३ लाख ८५ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून सर्वांनीच या प्राचिन मंदिराचं कौतुक केलंय. कारण या मंदिराभोवतीचा प्रदेश, मोठमोठ्या इमारती पाण्यात वाहून जाताना दिसतायेत. अगदी झाडं सुद्धा टिकलेली नाहीत. मात्र हे एकटं मंदिर या पाण्याचा सामना करताना दिसतेय. अन् याचं पूर्ण श्रेय जातं ते या मंदिराची निर्मिती करणाऱ्या इंजिनियर्सला. त्यांनी या मंदिराची रचना अशी केलीये की कितीही पाणी आलं तरी ते जागचे हलणार नाही. आत्ताच्या इमारती तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मात्र तरी देखील त्या पाण्याच्या प्रवाहात टिकताना दिसत नाहिये परिणामी जुन्या इतिहासातल्या इंजिनियर्सकडून आपण काहीतरी शिकायला हवं अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Leave a Comment