Pune Crime: मुलाचं नवं घर पाहायला आलेल्या आईचा खून, ओळखीतील अल्पवयीन मुलानेच वृद्धेला संपवलं

Pune Crime: मुलाचं नवं घर पाहायला आलेल्या आईचा खून, ओळखीतील अल्पवयीन मुलानेच वृद्धेला संपवलं

Pune Cime: पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण काही करता कमी होत नाहीय. ६ जुलै रोजी पिंपरी-चिंचवड येथील चिखली येथील रुपिनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. अपमान.

पुणे : मुलाने घेतलेले नवीन घर पाहण्यासाठी गावाकडून शहरात आलेल्या वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना सहा जुलैला सकाळी तळवडे येथील जिजाऊ हाउसिंग सोसायटीमध्ये घडली होती. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याने किरकोळ अपमानाचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याचे कबूल केले आहे.

शोभा जगन्नाथ आमटे (वय ६८, रा. रुपीनगर, तळवडे. मूळ रा. बेरडवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा पोपट जगन्नाथ आमटे (वय ३८, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोपट यांच्या आई गावी राहतात. ते अनेक वर्षापासून पिंपरी-चिंचवडमध्ये राहतात. त्यांनी नुकतेच नवीन घर घेतले होते.

घराबाहेर काढल्याचा बदला…

ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील आणि पोपट आमटे मित्र आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलगा पोपट यांच्या घरी जात असे. मात्र, एकदा त्याला पोपट यांच्या आई शोभा यांनी धक्काबुक्की करून घराबाहेर काढले होते. त्यामुळे सर्वांसमोर अपमान झाल्याचा राग त्याच्या मनात होता. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने शोभा या घरात एकट्या असताना त्यांच्या डोक्यात लोखंडी बत्ता मारून त्यांचा खून केला.

Leave a Comment