Tomato Farming: पती पत्नीचं प्लॅनिंग सक्सेसफुल, टोमॅटोमुळे अखेर सोन्याचे दिवस, शेतकरी दाम्पत्य बनलं करोडपती
Tornato Farmer Success Story: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. राज्यातील काही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील गायकर दाम्पत्यानं सव्वा कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पुणे : राज्यासह संपूर्ण देशभर टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होतोय. केंद्र सरकारनं महाराष्ट्र, व… कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये नाफेड तर्फे टोमॅटो खरेदीचे आदेश काढले आहेत. अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यात टोमॅटो उत्पादकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. आता या दरवाढीमुळं महाराष्ट्रातील काही शेतकन्यांना फायदा झाला आहे. पुण्यातील ईश्वर गायकर आणि सोनाली गायकर या शेतकरी दाम्पत्यानं सव्वा कोटी रुपयांची कमाई केली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पाचघर गावातील गायकर दाम्पत्यानं १२ एकरातील टोमॅटो पिकाच्या जोरावर सव्वा कोटी रुपयांची कमाई केली आहे. गायकर दाम्पत्य गेल्या सात वर्षांपासून टोमॅटोची शेती करतात. यावेळी त्यांच्यासह इतर शेतकरी देखील लखपती झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांना फायदा मात्र झाला आहे.
गेली दोन वर्ष टोमॅटो या पिकाला बाजारभाव न मिळाल्याने अनेक टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. मात्र यंदाच्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे सर्व टोमॅटो मार्केट फुल्ल असल्याचे पहायला मिळत आहे. टोमॅटो मुळे जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. टोमॅटोमधून त्याला जणू काही लॉटरीच लागली आहे. जुन्नर तालुक्यातील एका शेतकरी दाम्पत्याचं या टोमॅटोने कोट्याधीश बनवले आहे. ईश्वर गायकर आणि सोनाली गायकर असं या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे.
कर्ज काढून पत्नीचे स्वप्न पूर्ण केले, सरकारी नोकरी मिळताच ‘काळा’ आहेस म्हणत झिडकारले
१२ एकरात टोमॅटो शेती
जुन्नर तालुक्यातील पाचघर हे गाव पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. मुबलक प्रमाणात पाणी असल्याने या गावाचा कायापालट झाला आहे. या गावातील तुकाराम भागोजी गायकर हे शेतकरी याच गावात राहणारे. त्यांची परंपरागत शेती आहे. या भागात जवळपास १८ एकर क्षेत्र बागायती आहे. त्यापैकी बारा एकर क्षेत्रावर गायकर यांचा मुलगा ईश्वर गायकर आणि सून सोनाली गायकर शेती बघतात. ते दरवर्षी टोमॅटो पिकाची लागवड करतात. मात्र यंदाच्या वर्षी लावलेल्या टोमॅटोने त्यांना करोडपती बनवले आहे.
एकाच दिवशी १८ लाखांची कमाई
गायकर यांना टोमॅटो विक्रीसाठी पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मार्केट जवळ आहे. त्यामुळे ते तिकडे टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जातात. आतापर्यंत त्यांनी महिनाभरात जवळपास १३ हजाराहून अधिक टोमॅटो क्रेट विक्री केले. असून त्यातून त्यांना सव्वा कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी एकच दिवशी ९०० क्रेटची विक्री केली त्यातून त्यांनी एकच दिवशी १८लाख रुपये मिळाले आहेत. ते सात वर्षांपासून टोमॅटो लागवड करतात.