Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी मध्ये सेविकांची भरती.

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी मध्ये सेविकांची भरती.

अट होती 12वी पास, मात्र अर्ज आले केमिकल इंजिनयर आणि पदव्युत्तर इच्छुकांच 140 कोटी लोकसंख्येच्या या देशात ती तरुणांचे तोडे रोजगाराच्या शोधत देश पालथा घालत आहेत. तरीही रोजगार मिळेल याची शाश्वती नाही. अस्वस्थ तरुणांच्या हाताला काम हवे आहे आणि ते देण्यास सरकार कमी पडत आहे.

गेल्या काही काळात सातत्याने बेरोजगारीच्या दरात वाढ होत असताना दिसत आहे. दर वर्षी त्यात संख्यात्मक वाढच होत आहे. ही बेरोजगारी किती भीषण अवस्थेला पोहचली आहे याचा प्रत्यय सध्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी सुरू

झालेल्या भरती प्रक्रियेदरम्यान आला आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत असणाऱ्या विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 480 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून त्यासाठी 12वी उत्तीर्ण ही प्रमुख अट आहे.

केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा पुण्यात अनवाणी मोर्चा अंगणवाडी सेविका कुपोषित सरकारी व्यवस्थेच्या बळी अंगणवाडी मदतनीस पदासाठी 12वी उत्तीण आणि दरमहा केवळ 5.500 रुपयांचे मानधन असतानाही या पदासाठी चक्क केमिकल इंजिनिअरिंग, एमएस्सी, एमए तसेच बीए उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चार वर्षांनंतर ही भरती प्रक्रिया घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले असून दीड ते दोन हजार रिक्त जागांसाठी राज्यभरातून तब्बल 12: हजारांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यात सुमारे 1 लाखापेक्षा अधिक अंगणवाड्या असून त्यातून अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. मागील चार वर्षांत मदतनीस पदाची भरती झालीच नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेवर कामाचा जादा ताण येत होता. त्यामुळे ही पदे तातडीने भरण्याची मागणी होत होती. त्यानंतर शासनाने पदे जुलै अखेर पर्यंत भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्प पातळीवर रिक्त जागांची माहिती ग्रामपंचायतच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. अंगणवाडी मदतनीस या पदासाठी राज्यात सुमारे दीड ते दोन हजार रिक्त जागा असताना तब्बल 12 हजारापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. उमेदवारांच्या अर्जाची तपासणी करून गुणानुक्रमे अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. जुलै महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले, अंगणवाडी मदतनिसांना अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजामध्ये मुलांना बोलावून आणणे, पोषण आहार शिजवणे, मुलांना पोषण आहार देणे तसेच सेविकांना मदत करण्याचे काम करावे लागते.

पात्रता 12 वी पण पदव्युत्तरांचे अर्ज

या पदासाठी 12वी पास पात्रता ठेवण्यात आली आहे. मात्र राज्यातील बहुतांश ठिकाणी बीए, एमए बीकॉम, एमकॉम झालेल्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत, तर काही ठिकाणी चक्क केमिकल इंजिनिअर उमेदवाराने अर्ज केल्याचे छाननीमध्ये आढळून आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना बारावीमध्ये मिळवलेल्या टक्केवारीवर गुण दिले जाणार असून त्यानंतर आरक्षित संवर्ग तसेच अतिरिक्त पात्रतेनुसार वाढीव गुण दिले जाणार आहेत. या एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असून यामध्ये सर्वात जास्त गुण मिळवलेल्या उमेदवाराची या पदासाठी निवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment