Beed News : केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद

Beed News : केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद

केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील जवान उमेश नरसू मिसाळ यांचा सोमवारी पहाटे राजस्थानमधील सुरतगड येथे परेडसाठी जात असताना भूमिगत वीज तारेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

केज तालुक्यातील उमेश नरसू मिसाळ (22) हे 2 वर्षापूर्वी 25 मराठा बटालियनमध्ये शिपाई म्हणून भरती झाले होते. उमेश मिसाळ यांचे आई व वडील ऊसतोड कामगार आहेत. त्याचा विवाह केकणवाडी येथील प्रतीक्षा केकाण हिच्याशी 6 महिन्यांपूर्वी झाला होता. 15 दिवसांपूर्वी तो आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी गावी आला होता. पण त्यांच्या पुतण्याच्या हळदीच्या दिवशी त्यांना ताबडतोब मराठा बटालियनमध्ये परतण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आपल्या पुतणीचे लग्न सोडून ते सुरतगड, राजस्थानला राष्ट्रसेवेसाठी निघून गेले.

दरम्यान, सोमवारी सकाळी परेडला जात असताना भूमिगत वीजवाहिनीचा शॉक लागून ते सेवा बजावत असताना शहीद झाले. ही बातमी गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व 2 भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले माहिती तहसीलदार एम. जी. खंडागळे यांनी दिली.

Leave a Comment