Farmer Motivational Story : मराठी शेतकऱ्यानं केली कमाल, गायींचं शेण विकून बांधला १ कोटींचा बंगला

Farmer Motivational Story : मराठी शेतकऱ्यानं केली कमाल, गायींचं शेण विकून बांधला १ कोटींचा बंगला

Farmer Motivational Story: मोठमोठ्या उद्योजकांनी म्हटलय की व्यवसाय करण्यासाठी भरपूर पैसे नाही तर तुमच्याकडे एक चांगली कल्पना असणं गरजेचं आहे. अन् या शेतकन्या

मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही, अनेकदा असे उपरोधिक टोले मारले जातात. पण मराठी माणसानं मनात आणलं तर तो काहीही करू शकतो. असे कित्येक मराठी उद्योजक दाखवता येतील ज्यांनी मुठभर पैशांमधून करोडो रुपयांचा उद्योग उभा केलाय. याच पार्श्वभूमीवर एका मराठी शेतकन्यानं सर्वांनाच चकित केलंय. आश्चर्याची बाब म्हणजे या शेतकऱ्यानं गायीचे शेण विकून तब्बल १ कोटी रुपयांचा बंगला बांधलाय. या बंगल्याचं नाव त्यांनी ‘गोधन निवास’ असं ठेवलंय. बेटावर मोठमोठ्या उद्योजकांनी म्हटलंय की व्यवसाय करण्यासाठी भरपूर पैसे नाही तर तुमच्याकडे एक चांगली कल्पना असणं गरजेचं आहे. अन् या शेतकऱ्यानं तेच करून दाखवलं, जे शेण लोक कचऱ्यात फेकून देतात त्याच शेणापासून त्यानं कोट्यवधींचा उद्योग उभा केलाय. या शेतकऱ्याची यशोगाथा पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.

या शेतकऱ्याचं नाव प्रकाश नेमाडे असं आहे. ते सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या गावात राहतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ४ एकर जमिन होती. पण पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना या जमिनीत शेती करणं काही शक्य होत नव्हतं. परिणामी उपजीविकेसाठी त्यांनी गायीचं दूध विकण्याचं काम सुरू केलं. लक्षवेधी बाब म्हणजे जेव्हा त्यांनी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे केवळ १ गाय होती. या गायीचं दूध ते गावागात जाऊन विकत असतं. अन् आज त्यांच्याकडे तब्बल १५० पेक्षा अधिक गायी आहेत. एक हुशार उद्योजक हा नेहमी आपल्या व्यवसाय कसा वाढवायचा याचा विचार करतो. प्रकाश नेमाडे यांनी थेट आंडन पुगनूर देखील तेच केल. त्यांनी दूधासोबतच गायीचं शेण विकण्याचाही व्यवसाय सुरू केला

२५ वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे सरपंचपद, ४ जण झाले सरपंच, कुटुंबाची परिस्थिती वाचून अवाक व्हाल

Leave a Comment