salag 25 varsh sarpanch pad २५ वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे सरपंचपद, ४ जण झाले सरपंच, कुटुंबाची परिस्थिती वाचून अवाक व्हाल

salag 25 varsh sarpanch pad २५ वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे सरपंचपद, ४ जण झाले सरपंच, कुटुंबाची परिस्थिती वाचून अवाक व्हाल

Nanded Kinwat Daheli Tanda Sarpanch Post From 25 Years In Family : राजकारणात एखाद्याला पद मिळालं की त्याच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट असते. पद….

२५ वर्षांपासून सरपंचपद ना चार चाकी ना बंगला, हलाकीची परिस्थिती अन् पश्याच

नांदेड : मागील २५ वर्षांपासून एकाच घरात सरपंचपद असूनही हलाकीची परिस्थिती आहे. सरपंचपद अनही कुटुंबातील सदस्य आजही सालगडी आणि मोलमजुरीचं काम करत आहेत. आयुष्यात त्यांनी कवडीची कमाई केली नाही आणि त्यांना सरपंच पदाचा गर्वही नाही. मिळेल ते काम करुन कुटुंबीय उदरनिर्वाह करत जनतेची सेवा करत आहे. एका सरपंच कुटुंबाची ही समाजाला विचार करायला लावणारी कहाणी आहे.

किनवट तालुक्यातील व्हेली तांडा येथील कुटुंबातील सूनबाई ह्या सह्या दहेली तांडाच्या सरपंच आहेत. कुटुंबात रामदास तोडसाम आणि पार्वतीबाई तोडसाम यांची दोन मुलं आणि सुना नातवंड आहेत. २५ वर्षांपूर्वी रामदास तोडसाम आणि त्यांचे कुटुंबीय रोजगाराच्या शोधात दहेली तांडा येथे आले होते. तोडसाम कुटुंबीय आदिवासी परधान जातीवर मोडतात. गावातील मोहन जाधव यांच्याकडे सालगडी म्हणून कामाला आहेत. आजही संपूर्ण कुटुंब सालगडी म्हणून काम करत आहे. जनावरांना पाणी पाजवणे, चारा घालणे यासह शेतातील कामं कुटुंबीय एकत्र करतात. त्या मोबदल्यात कुटुंबीयांना वर्षात जवळपास एक लाख कुन्हाडीने डोक्यात वार, हाताचे बोट निकामी, ग्रामपंचायत सभेत महिला सरपंचावर जीवघेणा रुपये मिळतात.

आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घट

सरपंचपद आदिवासी जातीसाठी आरक्षित झालं अन् लागली लॉटरी

दहेली तांडा हे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं गाव आहे. या गावात जवळपास दोन हजार लोकवस्ती आहे. बंजारा समुदाय येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. मुस्लिम कुटुंबही आहेत. दहेली तांडा २५ वर्षांपूर्वी दहेली गाव आणि दहेली तांडा ग्राम पंचायत वेगळे झाल्यानंतर ग्रामपंचायत सभेत दहेली ग्राम पंचायतीच सरपंचपद हे आदिवासी समाजासाठी आरक्षित झालं. त्यामुळे आदिवासी समाजातील एकमेव कुटुंब असल्याने रामदास तोडसाम यांना सरपंचपदाची संधी मिळाली. त्यानंतर सलग चार वेळा सरपंचपद हे आदिवासी समाजासाठी कायम राहिलं. रामदास तोडसाम यांनी दहा वर्षे सरपंच तर त्यांची पत्नी पार्वतीबाई तोडसाम ह्या पाच वर्ष, मुलगा राजेंद्र तोडसाम हे पाच वर्ष आणि आता त्यांची सुनबाई मनीषा जयवंत तोडसाम सरपंच म्हणून काम पाहत आहेत. या ग्राम पंचायतीत ९ सदस्य आहेत.

Leave a Comment