Pune-mumbai news: पुणे- मुंबई लोहमार्गावर धावत्या रेल्वेतून पडून व्यापाऱ्याचा मृत्यू

Pune-mumbai news: पुणे- मुंबई लोहमार्गावर धावत्या रेल्वेतून पडून व्यापाऱ्याचा मृत्यू

तळेगाव दाभाडे (पुणे) : पुणे मुंबई लोहमार्गावर एका अज्ञात रेल्वेगाडीतून पडून एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. विद्याचर विजयकुमार इनामदार (वय ४८, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई लोहमार्गावर तळेगाव दाभाडे व वडगावच्या दरम्यान एमआयडीसी रोडच्या पुलालगत रेल्वे किलोमीटर क्रमांक १५५/५१ जवळ सोमवारी (दि. १२) सायंकाळी ४:३० च्या सुमारास एका अज्ञात रेल्वे गाडीतून पडून विद्याधर इनामदार गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. विद्याधर इनामदार यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच तळेगाव शहरातील राव कॉलनी विभागावर शोककळा पसरली. विद्याधर इनामदार हे तळेगाव दाभाडे रोटरी सिटीचे सदस्य होते. ते मनमिळावू आणि शांत स्वभावाचे होते. ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांचे ते बंधू होत. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे

डॉ. मनोजकुमार चौधरी यांनी शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास रेल्वेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय तोडमल करीत आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment