Breaking news Today खळबळजनक! आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारी सापडलं 4 दिवसांचं बाळ; 3 | दिवसांपासून घर बंद

Breaking news Today खळबळजनक! आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारी सापडलं 4 दिवसांचं बाळ; 3 | दिवसांपासून घर बंद

धक्कादायक बाब म्हणजे मृत दाम्पत्याचं 4-5 दिवसांचं बाळ जिवंत आढळून आलं. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही बाब उघडकीस आली.

उत्तराखंडमधील डेहरादूनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका घरातून पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. मृतदेह तीन दिवस जुने असल्याने ते कुजलेले होते. धक्कादायक बाब म्हणजे मृत दाम्पत्याचं 4- 5 दिवसांचं बाळ जिवंत आढळून आलं. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही बाब उघडकीस आली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणाने कर्ज घेतलं होतं, ते फेडू न शकल्याने त्याने पत्नीसह आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

13 जून रोजी पोलीस कंट्रोल रुमला टर्नर रोडवरील एका घरातून खूप दुर्गंधी येत असल्याने आत मृतदेह असू शकतो अशी माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे प्रमुख आपल्या टीमसह टर्नर रोडवरील C13 घराजवळ पोहोचले. एक दरवाजा बाहेरून बंद होता तर दुसऱ्या दाराला आतून कडी लावली होती दरवाजा उघडला असता दोन मृतदेह जमिनीवर पडलेले दिसले.

खोलीत 4-5 दिवसांचं बाळ सापडलं

पोलिसांच्या पथकाने घरामध्ये झडती घेतली असता खोलीत 4-5 दिवसांचं बाळ सापडलं. मुलगी जिवंत होती, पोलिसांनी तिला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवलं. पोलिसांनी एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण करून तपास केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेहांवर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले.

एक वर्षापूर्वी झालेलं लग्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह हे सहारनपूर जिल्ह्यातील नागल पोलीस स्टेशनच्या चहलोली भागातील 25 वर्षीय काशिफचा मुलगा मोहताशिम आणि त्याची पत्नी अनम (२२) यांचे आहेत. चार महिन्यांपूर्वीच तs या घरात राहायला आले होते. सोहेल असं घरमालकाचं नाव असून तो उत्तरकाशी येथील जोशीडा येथील रहिवासी आहे. मृताच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावले असता काशिफचे दोनदा लग्न झाल्याचे समजले. पहिल्या लग्नापासून पाच वर्षांची मुलगी आहे. तर, वर्षभरापूर्वी त्याने अनम नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं.

पहिल्या पत्नीचे नाव नुसरत असून, माझा नवरा दोन-तीन दिवसांपासून फोन उचलत नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. माझे शेवटचे बोलणे 10 जून रोजी रात्री 11 वाजता होते. काशिफने उधार घेतलेले पाच लाख रुपये परत करायचे असल्याने उद्या गावी येणार असल्याचे सांगितले. दोन-तीन वेळा फोन आला नाही आणि नंतर फोन बंद झाला. मी येथे आले तेव्हा घराला कुलूप असल्याचे दिसले. त्यानंतर मी माझ्या सासऱ्यांना आणि भावाला याबद्दल सांगितले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment