Pandharpur Wari: आळंदीमध्ये वारकरी पोलिसांमध्ये बाचाबाची, मंदिर प्रवेशावरून वाद

Pandharpur Wari: आळंदीमध्ये वारकरी पोलिसांमध्ये बाचाबाची, मंदिर प्रवेशावरून वाद

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात वारकऱ्याची मोठी गर्दी झाली होती. मात्र या पालखी सोहळ्यात दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होत..

वारी प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलिसाचा शाब्दिक वाद झाला आहे. त्याचवेळी वारकऱ्यानी बॅरिकेट्स तोडली आणि मंदिरात प्रवेश – करण्याचा प्रयत्न केला. पोलीस वारकऱ्यांना अडवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यामुळे त्याच्यामध्ये वाद झाल्याच पाहायला मिळाल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

या सगळ्या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहिली गोष्ट म्हणजे लाठीचार्ज झालेला नाही, मात्र तिथे थोडीफार बाचाबाची आणि झटापट झालेली आहे. 400-500 तरुण वारकन्यानी बेरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना याबवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनाही बोर्ड लागलं आहे. आपण व्हिडिओ बघितले तरी तिकडे कोणताही लाठीचार्ज, झालेला नाही, त्यांना थांबवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. नंतर परिस्थिती शांत झाली आहे, असे फडणवीस म्हणाले

मागच्या वर्षीची स्थिती पाहता यावेळी बैठकीत मानाच्या दिड्यासाठी 75 पास देत आत सोडण्याचा निर्णय घेतला होता. जेणेकरून चेंगराचेंगरी होणार नाही, त्याप्रमाणे मानाच्या दिडीचे लोक पोहोचले होते, इतर लोकांनी आत घुसण्याचा आग्रह केला आणि बैरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून निर्णय झाला होता. चुकीची घटना घडू नये यासाठी प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment