Eknath shinde yanche wari darshan kele band:सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू न देण्याचा इशारा, नेमकं प्रकरण काय ?

Eknath shinde yanche wari darshan kele band:सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू न देण्याचा इशारा, नेमकं प्रकरण काय ?

आषाढी एकादशी जवळ आली आहे. मानाच्या पालख्या आता पंढपूरच्या दिशेला प्रस्थान करत आहेत. हजारो वारकरी पालख्या सहभागी झाले आहेत. शेकडो दिंड्या पंढरपूरच्या दिशेला मार्गक्रमण | करत आहेत. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आळंदीत घडलेल्या घटनेवरुन मोठा इशारा देण्यात आला आहे..

पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अनपेक्षित अशी घटना घडली. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी प्रस्थानच्या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात प्रवेश करण्यावरुन मोठा वाद उफाळला. यावेळी पोलिसांनी अनेक वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून | रोखलं होतं. संबंधित घटना ही काल (12 जून) घडली. पालखी सोहळ्याचा तो पहिला दिवस होता. पण पहिल्याच दिवशी पालखी सोहळ्याला गालबोट लागलं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेला प्रस्थान करत असताना हा प्रकार घडला. या घटनेवरुन आता राजकारण उफाळून आलंय. विरोधकांनी वारकऱ्यांवर | लाठीचार्ज झाल्याचा आरोप केलाय. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप फेटाळला आहे.

Shasan aaplya dari | शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत उद्या शिंदे फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर

दुसरीकडे पोलिसांकडून आळंदीत घडलेल्या घटनेचा आणखी एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. तर काही वारकऱ्यांनी | आपल्याला एका खोलीत डांबून पोलिसांकडून मारहाण करण्यात | आल्याचा आरोप केला आहे. या सगळ्या घटानाक्रमाचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात पडताना दिसत आहेत. संबंधित घटनेप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी संभाजी | ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. तसेच त्यांनी माफी मागितली नाही तर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.

 संभाजी ब्रिगेडकडून नेमका इशारा काय?

संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी हा इशारा दिला आहे. “नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारकल्यांची माफी मागावी. अन्यथा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही”, असा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेकडून राज्य सरकारला देण्यात आला .

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment