Tomato Price टोमॅटोने घेतली पुन्हा फिरकी, या शहरात भावात 7 पट वाढ

Tomato Price टोमॅटोने घेतली पुन्हा फिरकी, या शहरात भावात 7 पट वाढ

Tomato Price टोमॅटोचे उत्पादन होणाऱ्या राज्यातच टोमॅटोने उच्चांक गाठला आहे. गेल्या सात आठवडयात या शहरात 7 पटीने किमती वाढल्या अगोदरच पावसाने झोडपल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहते, आता त्यात टोमॅटोने त्यांचा घाम काढला आहे.

मुंबई | 25 जुलै 2023 ग्राहक निर्देशांकाने (Consumer Affair Record) आकडे समोर आले आहे. 23 जुलै रोजी हे आकडे समोर आहेत. त्यानुसार, देशात टोमॅटोची अधिकतम किंमत 200 रुपयांपेक्षा खाली आली आहे. तर मुंबईचा विचार करता किरकोळ बाजारात पा किंमती 160 रुपये प्रति किलोग्रॅमवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या एका महिन्यात टोमॅटोने सोन्यासारखा भाव गाठला. सोन्याला ही टोमॅटोने दरवाढीत (Tomato Price Hike) मागे टाकले. 25-30 रुपये किलोवरून टोमॅटोने थेट 300-350 रुपये किलोपर्यंत झेप घेतली केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याने प्रकरण पोर्ड निवळले. उत्तर भारतात अनेक ठिकाणी टोमॅटो 70-90 रुपये किलोने विक्री होत आहे. पण टोमॅटोने उत्पादन होणाऱ्या राज्यात टोमॅटोने उच्चांक गाठला आहे. गेल्या सात आठवत या शहरात पटीने किमती वाढल्या अगोदरच पावसाने झोडपल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण जाते. आता त्यात टोमॅटोने त्यांचा घाम काढला आहे.

मुंबईत टोमॅटोचा रेकॉर्ड

मुंबईस टोमॅटोने किंमतीत नवीन रेकॉर्ड केला. मुंबईत टोमॅटो 200 रुपये प्रति किलोवर पोहचले. किंमतीत वाढ झाल्याने याचा खरेदीदारांच्या संख्येवर परिणाम झाला. ग्राहकांची संख्या रोडावली आहे. त्याचा परिणाम ग्राहकांवर झाला टोमॅटो विक्रीची अनेक दुकाने बंद पडली.

7 आठवडयात 7 पट दाम

जास्त पावसाने टोमॅटोच्या पिकावर पाणी करते. टोमॅटो खरब झाले. तसेच इतर भाजीपाला पण महागले. टोमॅटोच्या किंमती जून महिन्यापासून सातत्याने वाढत आहे. जूनमध्ये टोमॅटोच्या किमती 30 रुपये प्रति किलो होत्या. 13 जून रोजी किमती 50-60 रुपयांवर पोहचल्या. जूनच्या शेवटी भाव 100 रुपयांवर गेले. 3 जुलै रोजी टोमॅटोचे भाव 160 रुपये किलोपर्यंत वाढल्या. तर येत्या काही दिवसांत टोमॅटो 200 रुपये किलोवर पोहचणार असल्याची व्यापान्यांची भविष्यवाणी आहे.

यामुळे वाढणार किमती

TIO ने एक रिपोर्ट दिला, त्यानुसार, एपीएमसी वाशीचे संचालक शंकर पिंगळे यांनी टोमॅटोच्या किंमतीची माहिती दिली. टोमॅटोचा घाऊक दर 80 ते 100 रुपये प्रतिकिलो आहे. पावसाचा तडाखा, रेड अलर्ट वाहतूक कोंडी, सख भागात पाणी साचल्याने माल वाशी मार्केटमध्ये पोहचत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे किमती वधारल्या आहेत. काही दिवसात टोमॅटोचा पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टोमॅटो 200 रूपयांच्या पुढे

टोमॅटोचा भाव 110 ते 120 रुपये प्रति किलो असल्याची माहिती वाशी मार्केटमधील व्यापारी सचिन शितोळे यांनी दिली. दादर मार्केटमध्ये टोमॅटोचा घाऊक दर 160 ते 180 रुपये प्रति किलो असल्याची माहिती भाजी विक्रेता रोहित केसरवानी यांनी दिली.

Leave a Comment