Monsoon Update: दिवसभरात राज्यातील पावसाची स्थिती कशी होती? जाणून घ्या एका क्लीकवर

Monsoon Update: दिवसभरात राज्यातील पावसाची स्थिती कशी होती? जाणून घ्या एका क्लीकवर

राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले

कोल्हापुरातील राधानगरी धरण परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. धरणही शंभर टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरु करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत धरणाचे स्वयंचलित पाच दरवाजे उघडण्यात आले, अशी माहिती राधानगरी धरणाचे उपअभियंता प्रवीण पारकर यांनी दिली.

पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिथी हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे

कोल्हापूरला आज रेड, उद्या ऑरिंज अलर्ट साताऱ्याला दोन दिवस रेड अलर्ट

राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस आहे. आज हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट, तर उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे. सध्या पंचगंगा नदीवरील राजाराम बांधाऱ्यांची पाणीपातळी 40 फूट 5 इंच आहे. तर इशारा पातळी 39 फुट व धोका पातळी 43 फुट आहे. जिल्ह्यातील 87 बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगेने इशारा पातळी ओलाडली आहे. नदीकाठावरील गावांचे स्थलांतर केले जात आहे. दरम्यान सातारा जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे

Leave a Comment