पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली; सुदैवाने जीविहितहानी नाही

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली; सुदैवाने जीविहितहानी नाही

पुणे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री दरड कोसळली. दरड कोसळ्यानंतर

मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. वाहतूक ठप्प झाल्याने कोंडी झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच आयआरबी, देवदूत यंत्रणा, तसेच महामार्ग पोलिसांचे पथक • घटनास्थळी दाखल झाले. घाटात पडलेली दरड काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. दरड काढण्यासाठी जेसीबी यंत्र, डंपर मागविण्यात आले आहेत. दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. दरम्यान, वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तीन मार्गिकेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन वळविण्यात आली आहे.

हेसुद्धा वाचा पुणे ‘: पर्वती भागात कोयता गँगची दहशत

Leave a Comment