ऑगस्टमध्ये सणच सण! १४ दिवस बंद राहणार बँका; खोळंबा टाळण्यासाठी आधीच वाचा सुट्ट्यांची यादी

ऑगस्टमध्ये सणच सण! १४ दिवस बंद राहणार बँका; खोळंबा टाळण्यासाठी आधीच वाचा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays in August 2023 पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट २०२३ मध्ये विविध झोनमध्ये एकूण १४ बँकांना सुट्ट्या असतील. वाचा सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर.

नवी दिल्ली: सध्या बँकेची बरीचशी कामे ऑनलाईन पद्धतीने केली जातात. पण तरीही बँक खाते उघडणे, धनादेशाशी संबंधित काम आणि अशी अनेक कामे आहेत, ज्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी, तुम्हाला ऑगस्ट २०२३ मधील बँकेच्या सुट्टीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही बँकेच्या शाखेत गेलात आणि बँकेला सुट्टी आहे असे घडू नये; त्यासाठी जाणून घेऊया ऑगस्टमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी.

पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये विविध झोनमध्ये एकूण १४ दिवस बँकांना सुट्टी असेल. यासोबतच ऑगस्टमध्ये लाँग वीकेंडही येत आहे. २६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट असा लाँग वीकेंड आहे. झोननुसार ते बदलूही
शकतात. आरबीआयच्या नियमांनुसार दर रविवारी आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या-चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते. ऑगस्टमध्ये
बँका कोणत्या तारखांना बंद राहतील पाहूया.

ऑगस्टमध्ये या तारखांना बँकांना सुट्ट्या असतील 

६ ऑगस्ट २०२३- या दिवशी रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

८ ऑगस्ट २०२३- तेंडोंग ल्हो रम फाट्यामुळे गंगटोकमध्ये सुट्टी असेल.

१२ ऑगस्ट २०२३- या दिवशी, दुसरों शनिवार असल्यामुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

१३ ऑगस्ट २०२३- या दिवशी रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

१५ ऑगस्ट २०२३- स्वातंत्र्य दिनानिमित्त या दिवशी देशभरात बँका बंद राहतील.

१६ ऑगस्ट २०२३- पारशी नववर्षानिमित्त या दिवशी मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहतील.

१८ ऑगस्ट २०२३- श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.

२० ऑगस्ट २०२३ – रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

२६ ऑगस्ट २०२३- या दिवशी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

२७ ऑगस्ट २०२३- रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

२८ ऑगस्ट २०२३- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये या दिवशी ओणमनिमित्त बँका बंद राहतील.

२९ ऑगस्ट २०२३- तिरुओणममुळे कोची आण तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.

३० ऑगस्ट २०२३- रक्षाबंधनानिमित्त जयपूर राहतील. आणि शिमला येथे बँका या दिवशी बंद 4

३१ ऑगस्ट २०२३ – या दिवशी डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुअनंतपुरममध्ये रक्षा बंधन / श्री नारायण गुरु जयंती / पंग-लबसोलमुळे बँकांना सुट्टी असेल.

Leave a Comment