धरण फुटल्याचे ऐकले, लोक सैरभैर पळू लागले, कार्यकारी अभियंता म्हणतात……

धरण फुटल्याचे ऐकले, लोक सैरभैर पळू लागले, कार्यकारी अभियंता म्हणतात.

कुणी म्हणा कोराळा धरण फुटले. त्यामुळे लोक सतर्क झाले. परिसरातील लोकांनी दुकान बंद केली, प्रशासनाने धरणाकडे धाव घेतली.

बुलढाणा राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला. कुठे दरळ कोसळली. कुठे भूस्खलन झालं, पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही लोकांच्या घरात पाणी शिरले. हे सर्व ऐकल्यानंतर मनात धस्स होते. त्यात धरण फुटल्याचे ऐकल्यानंतर लोक घाबरली. कुणी म्हणाले राजुरा धरण फुटलं, कुणी म्हणाल कोरहाळा धरण फुटले. त्यामुळे लोक सतर्क झाले. परिसरातील लोकांनी दुकान बंद केली. प्रशासनाने धरणाकडे धाव घेतली. काही लोकही नेमके काय घडलं हे पाहण्यासाठी गेले. लि गेल्यानंतर कळलं की, धरणाबाहेरील भागातून पाणी जात आहे. पण, तो तेवढासा धोकादायक नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले.

प्रशासनाने घेतली धरणाकडे धाव

जळगाव जामोद तालुक्यातील धरण फुटल्याची अफवा शहरासह तालुक्यात पसरली होती. कुणी म्हटले राजुरा धरण फुटले, तर कुणी म्हटले कोरहाळा चारण फुटले. चरण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. शहरातील नागरिक सैरभैर पळू लागले. दुकाने बंद झाली होती. प्रशासनाने खरेच काय आहे म्हणून धरणाकडे धाव घेतली.

धरणाला कोणताही धोका नाही

मात्र असे काहीही नसून धरण भरले होते. त्यातील शिल्लक पाणी सोडव्याच्या रूपाने बाहेर येत होते. धरणाच्या सांडव्याने बाजूला जागा केली. ल्यातून पाणी बाहेर येत असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. तर या धरणाला कोणताही धोका नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केले.

Buldhana News: सातपुड्यात ढगफुटी: जळगाव शहरासह तालुका जलमय, शेकडो घरे वाहून गेली, शेतीचे नुकसान

कोयना धरण फक्त अर्धे भरले

दुसरीकडे, पावसाचा दीड महिना उलटूनही कोयना धरण अजून अर्धेही भरत नाही. कोयना पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज आहे. वीज निर्मिती आणि सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाला समजली जाते. कोयना धरणात 47.76 tmc पाणीसाठा धरण झाला. धरण 44.42 % भरते आहे. हा पाणीसाठा वर्षीच्या तुलनेत कमी आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी आहे.

मोठ्या पावसाची गरज

पावसाळ्याच्या सुरुवातीला कोयना धरणाच्या पाणी साठयाने निचांकी पातळी गाठली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसाने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. सध्या पडणारा पाऊस हा धरण भरण्यासाठी पुरेसा नाही. कोयना धरण भरण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची गरज आहे.

Leave a Comment