Building Collapse: नानावटी ‘हॉस्पिटल’ जवळची इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, चौघांना ढिगाऱ्याखालून काढले
मुंबई: मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील नानावटी हॉस्पिटलजवळील दोन मजली इमारत रविवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत दोन वृध्द नागरिकांचा मृत्यू झाला असून दोन जखमीवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रिस्किला मिसौइटा आणि रॉबी मिसोइटा अशी मृतांची नावे आहेत. इमारतीत अडकलेल्या एकूण 4 जणांना बाहेर काढण्यात यश आले आणि त्यानंतर कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विलेपार्ले पश्चिम परिसरात दुपारी 2:27 वाजता सेंट ब्राझ रोडवर, नानावटी हॉस्पिटलजवळ स्थित 3 मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले..
पहिल्याच पावसात सोलापूरकरांची तारांबळ; शेकडो दुकाने अन् घरामध्ये शिरले पाणी
बचावकार्यात 4 रहिवाशांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आले आणि नजीकच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रिस्किला मिसौइटा आणि रॉबी मिसौइटा या दोन वृध्द नागरिकांना उपचारादरम्यान मृत घोषित केले. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईत दुसरी इमारत दुर्घटना घडली असून या विद्या विहार इमारत दुर्घटनेत तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या ३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. इमारतीत पोकळी बनवून पीडित लोकेशन कॅमेरा वापरून MFB द्वारे कसून शोध घेण्यात आला. तुळई आणि विभाजन भिंतीच्या अडथळ्यांमुळे अडकलेल्या व्यक्ती सापडत नाहीत. इमारतीच्या समोरचा भाग पाडण्यात आला या घटनेला 14 तास उलटून गेले असून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. वृद्ध महिला आणि पुरुष यांना काढण्यासाठी शासकीय यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत आहेत