Crime News : “दर्शना पवारचा खून झाल्याचे उघड; राहुल हांडोरेच्या शोधासाठी पोलीस सिन्नरला”

Crime News : “दर्शना पवारचा खून झाल्याचे उघड; राहुल हांडोरेच्या शोधासाठी पोलीस सिन्नरला”

राजगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दर्शनासोबत दिसणारी शेवटची व्यक्ती ही राहुल हांडोरे

वेल्हे: एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत राज गडाच्या पायथ्याशी आढळला होता. यामध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालातून तिचा खून झाला असल्याचे समोर आले असून, वेल्हे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे याच्या शोधासाठी पोलिसाचे एक पथक त्याच्या गावी शहा (ता. सिन्नर) येथे गेले पण तेथेही तो मिळून आला नाही. अन्य काही ठिकाणी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना आणि तिचा मित्र राहुल हंडोरे (रा. नाशिक) हे १२ जूनला ट्रेकिंगसाठी राजगडावर आले होते. दरम्यान, राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे दर्शनाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला, तर तिचा मित्र राहुल हंडोरेचा अद्यापही मिळून आलेला नाही. दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाला पोलिसांना नुकताच मिळाला आहे… त्यामध्ये दर्शनाच्या शरीरावर आणि डोक्याला मारहाणीच्या जखमा असून, त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

*Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, फोडल्या
30 गाड्या, पोलिसांनी काढली धिंड

राजगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दर्शनासोबत दिसणारी शेवटची व्यक्ती ही राहुल हांडोरे हा युवक पोलिसांच्या रडारवर आला आहे. राहुल हा सिन्नर तालुक्यातील शहा या गावातील रहिवासी असून तो देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे समोर आले आहे. मात्र दर्शनाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याच्या क्षणापासून तो बेपत्ता असल्याने पोलिसांचा मुख्य संशय त्याच्यावर आहे.

राहुलचा हांडोरेचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहे. ग्रामीण पोलिसांचे एक पथक सोमवारी राहुलच्या सिन्नर तालुक्यातल्या शहा या गावी गेले होते, पण तो तेथे मिळून आला नसला तरी त्याच्याबाबत महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

Leave a Comment