IMD Rain Updates “मान्सूनचा पाऊस रखडला, आयएमडीनं दिली काळजी वाढवणारी अपडेट, महाराष्ट्रात गंभीर स्थिती

IMD Rain Updates “मान्सूनचा पाऊस रखडला, आयएमडीनं दिली काळजी वाढवणारी अपडेट, महाराष्ट्रात गंभीर स्थिती

IMD Aridity Conditions : यंदा मान्सूनचा पाऊस रखडला आहे. अर्धा जून महिना संपला तरी पावसानं हजेरी लावली नाही. त्यामुळे भारतीय हवामान विभागानं काळजी वाढवणारी…..

पुणे : यंदा मान्सूनच्या पावसाचं आगमन उशिरानं झालं आहे. मान्सून दरवर्षी केरळमध्ये १ जून रोजी दाखल होतो. ८ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील ८० टक्के भागात ८ ते १४ जून दरम्यान कोरड वातावरण होतं. भारतीय हवामान विभागाच्या आर्द्रता विसंगती निर्देशांकानुसार याचा परिणाम कृषी क्षेत्रात दुष्काळ, पिकांच्या वाढीवर परिणाम आणि मातीमधील आर्द्रता कमी होण्यात दिसून येऊ शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार भारताच्या ४६ टक्के भूभागावर कोरड्या हवामानाचा गंभीर परिणाम दिसून आला. त्याशिवाय २० टक्के भूभागावर कोरडं हवामान किंवा शुष्क स्थिती होती. तर याचा परिणाम १५ टक्के भूभागावर सौम्य होता…

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शुष्क स्थिती किंवा कोरडे हवामान होतं. प्रामुख्यानं पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ही स्थिती होती. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य प्रदेश, तेलंगाणा, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये अशीच स्थिती होती

भयंकर! मणिपूरमध्ये जमावाचा पोलीस स्टेशन लुटण्याचा प्रयत्न; सुरक्षा दलांवर झाडल्या गोळ्या

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार कोरड्या हवामानासंदर्भातील स्थिती जून महिन्याअखेर बदलू शकते. आयएमडीचे वैज्ञानिक राजीब चट्टोपाध्याय यांनी सध्याची स्थिती कायम राहिल्यास शेतीपुढं मोठे प्रश्न निर्माण होतील आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा दिला. त्याशिवाय पिकांच्या वाढीवर आणि उत्पन्नावर देखील परिणाम होईल, असं ते म्हणाले.

गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मात्र स्थिती वेगळी आहे. त्या भागात चांगला पाऊस होत आहे. • वातावरणातील कोरडेपणा किंवा शुष्क वातावरण मोजण्यासाठी आर्द्रता निर्देशांकाचा वापर केला जातो. त्याद्वारे पाण्याची समस्या, त्यामुळे शेतीवर होणारा विपरित परिणाम, अपुरी आर्द्रता आणि मातीची स्थिती याची माहिती मिळते, असं आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. १५ जून ते २१ जूनमध्ये आर्द्रता निर्देशाकांबद्दलचा अंदाज जाहीर झाला आहे. त्यात मध्य भारतासंदर्भात गंभीर स्थिती आहे. महाराष्ट्राची स्थिती देखील गंभीर आहे. या काळात देशातील ३२ टक्के भागातील वातावरणातील आर्द्रता कमी असेल, असं आयएमडीनं सांगितलं

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment