Cyclone Biporjoy: अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ, मान्सूनचं काय होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

Cyclone Biporjoy: अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ, मान्सूनचं काय होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

Biporjoy Cyclone News: मान्सून आधीच उशिराने येत असताना आता त्यात चक्रीवादळाची भर पडली आहे. या वादळामुळे मान्सूनला आणखी वेळ लागण्याचा अंदाज….

मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी जाहीर केले. पुढील दोन दिवसांत उत्तरेकडे सरकताना वादळाची तीव्रता वाढत जाणार असल्याचेही ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

आग्नेय अरबी समुद्रातील सोमवारच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता २४ तासांमध्ये डिप्रेशन, डीप डिप्रेशनवरून चक्रीवादळापर्यंत पोचली. सध्या अरबी समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याने वादळाला मोठी ऊर्जा मिळत असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘आयएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. बांगलादेशाने वादळाला दिलेल्या ‘बिपरजॉय’ या नावाचा अर्थ आपत्ती असा होतो. सध्या वादळ मुंबईपासून एक हजार किलोमीटर नैऋत्येला असून, ताशी चार किलोमीटर वेगाने त्याचा उत्तरेकडे प्रवास सुरू आहे. पुढील २४ तासांमध्ये बिपरजॉय तीव्र चक्रीवादळाची श्रेणी गाठण्याची शक्यता आहे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

बिपरजॉय’ चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून दूर असून, त्याचा यापुढील अपेक्षित मार्ग उत्तरेकडे जात असल्याने भारताला या वादळापासून थेट धोका नाही. मात्र, वादळाभोवती फिरणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा प्रभाव किनारपट्टीला जाणवू शकतो. आठ ते दहा जूनच्या दरम्यान कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने या क्षेत्रात मासेमारीसाठी कोणीही जाऊ नये, अशी सूचना ‘आयएमडी’ने दिली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment