One State One Uniform Scheme: महाराष्ट्रातील सर्व शाळांत आता होणार ‘एक राज्य, एक गणवेश’ पहा कसा असेल नवा ड्रेस ?

One State One Uniform Scheme: महाराष्ट्रातील सर्व शाळांत आता होणार ‘एक राज्य, एक गणवेश’ पहा कसा असेल नवा ड्रेस ?

One State One Uniform Scheme : येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) राज्यात ‘एक राज्य, एक गणेश’ ही योजना राबवण्यात येईल. सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश असेल. राज्यातील २५ हजार सरकारी शाळांतील ६४ लाख २८ हजार विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी केली

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शासनाच्या निर्णयापूर्वीच अनेक शाळांनी गणवेशाची ऑर्डर दिल्याने यंदाच्या वर्षी विद्यार्थी पहिले तीन दिवस शाळेचा, तर उर्वरित तीन दिवस शासनाचा गणवेश वापरतील, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सर्व शासकीय शाळातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व शूज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. याबाबत केसरकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातच माहिती दिली होती. त्यासंदर्भातील माहिती देण्यासाठी केसरकर यांनी मंगळवारी सकाळी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली

असा असेल ड्रेस

आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट असा हा गणवेश असेल मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असेल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment