जगातील एकमेव गाव जिथे आजवर पाऊस पडलेला नाही; तरीही स्वर्गाशी होते तुलना, कारण वाचून व्हाल थक्क

जगातील एकमेव गाव जिथे आजवर पाऊस पडलेला नाही; तरीही स्वर्गाशी होते तुलना, कारण वाचून व्हाल थक्क

Village Where It Never Rains: तुम्ही हरिश्चंद्र गड पाहिला असल्यास तुम्हाला ढग वाहताना दिसणे म्हणजे काय याचा अंदाज असेलच तसे काहीसे वातावरण.

जगातील हे एकमेव गाव जिथे आजवर पाऊस पडलेला नाही

Al Hutaib Village: आपण सर्वच बहुधा मागील काही दिवसात कोणाची वाट पाहिली असेल तर तो म्हणजे पाऊस महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या असल्या तरी मुंबईसारख्या शहरात व राज्यातील अनेक भागात अद्याप पावसाचे निशाणही नाही. हवामान खात्याने सुद्धा चक्रीवादळासह पावसाचा तडाखा बसण्याचे अंदाज वर्तवले होते पण आता अंदमान निकोबारमध्ये पाऊस दाखवल व्हायला उशीर झाल्याने केरळ व महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागण्यासाठी अजून वाट पाहावी लागू शकते आपण वाट पाहिली तर एखाद्या दिवशी पाऊस येईल अशी निदान अपेक्षा तरी असते, पण तुम्हाला माहित आहे असंही एक गाव आहे जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडलेला नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार हे गाव यमन या देशाची राजधानी असून याचे नाव ‘अल-हुतेग असे आहे. हा उष्णकटिबंधीय प्रदेश असून इथे तापमान अधिक असते. मात्र यडीच्या महिन्यामध्ये या भागात सकाळी खूपच थंड वातावरण असते. उन्हाळा व हिवाळा जरी तीव्र स्वरूपात असला तरी पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये मात्र इथे पावसाचा थेंबही पडत नाही, असे सांगितले जाते. हे गाव पृथ्वीच्या पृष्ठापासून ३२०० मीटर उंचीवर आहे. ढगांची निर्मिती साधारण २००० मीटर उंचीवर होऊ लागते त्यामुळे भागात पाऊस होत नसल्याचे म्हटले जाते.

पण अस असल तरी तुम्ही वरील आकडेवारीनुसार अंदाज बांधू शकता की या गावात राहणाऱ्यांना काऊ काही आपण स्वर्गात राहतीय असाच आभास होऊ शकतो कारण अनेकदा गावाच्या चौफेर दिशेने ढंग दिसून येतात. तुम्ही हरिश्चंद्र गड पाहिला असल्यास तुम्हाला ढंग वाहताना दिसणे म्हणजे काय याचा अंदाज असेलच तसे काहीसे वातावरण या गावात १२ महिने दिसून येऊ शकते.

यमनमधील हे अल-हुतेब गाव एका उंच डोंगराच्या टोकावर असल्याने येथील दृश्य हे अत्यंत नयनरम्य असते. म्हणूनच अनेक पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देण्यासाठी येतात. या गावात ग्रामीण व शहरी दोन्ही पद्धतीची घरे दिसून येतात. या गावात बहुतांश लोकसंख्या ‘अल- बोहरा व अल-मुकरमा’ या समुदायाची आहे.

जगातील हे एकमेव गाव जिथे आजवर पाऊस पडलेला नाही

Leave a Comment