Monsoon 2023 Update मान्सूनची प्रतीक्षा संपली! आज | केरळमध्ये वरूणराजा बरसणार, महाराष्ट्रात या तारखेला..

Monsoon 2023 Update मान्सूनची प्रतीक्षा संपली! आज | केरळमध्ये वरूणराजा बरसणार, महाराष्ट्रात या तारखेला!!!

Monsoon In Kerla IMD Weather Updates: वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलांचा परिणाम मान्सूनवरही पाहायला मिळाला. जून महिना सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा.

नवी दिल्ली : देशातल्या काही राज्यांमध्ये तीव्र उन्हाळा आहे तर काही राज्यांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून (IMD) मान्सून २०२३ संबंधी मोठी माहिती समोर आली आहे. मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) लवकरच देशात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.

मान्सूनने धरला वेग

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, केरळच्या किनारपट्टीपासून मान्सून अवघ्या ४०० किलोमीटर अंतरावर आहे. मान्सूनसंबंधी भारताच्या हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, तो सध्या दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कौमोरिन परिसरात दाखल झाला आहे. तर दुसरीकडे, दक्षिण बंगालचा उपसागर आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरातही मान्सून वेगाने पुढे सरकताना दिसत आहे. त्यामुळे लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी येणार

दरम्यान, मान्सून आज केरळात दाखल झाला तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात वरुणराजाचे १० जूनला आगमन होणार असल्याची, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.Monsoon 2023 Update

पहा येथे संपूर्ण माहिती

Leave a Comment