Pune Crime News: मध्यरात्री पोलीस गस्त घालत होते, संशयित हालचाली आढळल्या अन् थेट पोलिसांच्या दिशेने बंदुकीची गोळी आली. नेमकं काय घडलं?
पुण्यातील वारजे परिसरात रात्रीच्या वेळी गस्त घातल असलेल्या पोलिसांवर आरोपींनी थेट गोळीवार करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे मध्यरात्री वारजे परिसरात खबबळ उडाली होती…
Pune Crime News: पुण्यात सध्या गुन्हेगारांना (Pune Crime News) वर्दीची भीतीच उरली नसल्याचं काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमधून समोर आलं आहे. पुण्यातील वारजे परिसरात रात्रीच्या वेळी गस्त घातल असलेल्या पोलिसांवर आरोपींनी थेट गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे मध्यरात्री वारजे परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आल मात्र काही आरोपी पळ काढून पसार झाले या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
रात्री 1 वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान वारजे भागातील रोझरी स्कूलच्या जवळ आठ ते दहा जणांच्या संशयास्पद हालचाली पोलीसांना दिसून आल्या त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिशेने जात असताना एका संशयित आरोपीने पोलीसांच्या दिशेने पिस्तूल रोखले. त्यानंतर आरोपींनी पोलीसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीसांनी देखील आरोपींच्या दिशेने फायरींग केले. यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपीने पोलीस कॉन्स्टेबल कट्टे यांच्या दिशेने धारदार शस्त्र फेकून मारल्याने ते जखमी झाले. त्यानंतर पाच आरोपींना पळून जात असताना पोलीसांनी पकडले. त्यानंतर इतर चार ते पाच आरोपींनी यांच्यावर पोलिसांवर गोळीबार करुन ते अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. इतर आरोपींची शोध चालू आहे.
आरोपीकडून गावठी पिस्तूल आणि इतर ऐवज जप्त….
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, त्यामध्ये चार जिवंत काडतूसे, दोन लोखंडी कोयते, कटावणी .. स्क्रू ड्रायव्हर हातोडा, असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासा दरम्यान ते एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले आहेत. स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याच्या तयारीने हे दरोडेखोर आले होते. हे दरोडेखोर सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
कोबिंग ऑपरेशन सुरूच
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या कारवाई वाहनांची तोडफोड आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत राबविलेल्या कारवाईत पोलिसांनी शहरातील विविध भागातून एकूण 159 गुन्हेगारांना अटक केली. यासोबतच आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हें शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांना या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.