राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सांगितलं

Politics news : राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सांगितलं

यावर दोघांत काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना होती. सुमारे पाऊण तास ही चर्चा सुरु होती. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत बैठकीत काय चर्चा झाली यावर भाष्य केले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्याची चर्चा होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा तसा आग्रहही होता. संजय राऊत आणि अभिजित पानसे यांची भेट यानंतर ते दोघेही आपापल्या ठाकरेंकडे गेले होते. राऊतांनी आज उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाल्याचे म्हटले होते. असे असताना राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याने राजकीय धुळवडीच्या या काळात चर्चाना उधाण आले होते.

यावर दोघांत काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना होती. सुमारे पाऊण तास ही वर्चा सुरु होती. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत बैठकीत काय चर्चा झाली यावर भाष्य केले आहे.

राज ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न तसेच बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात स्थानिक रहिवाशांचे प्रश्न तसेच सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले. या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढण्यात येईल असे शिंदे यांनी राज यांना सांगितले आहे.

यावेळी सुमारे २५ मिनिटे दोघांत स्वतंत्र राजकीय चर्चाही झाल्याचे समजते आहे. अजित पवार यांचे सरकारमध्ये येणे, मनसे-ठाकरे गट एकत्र येण्यावरही चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Leave a Comment