बाजारात कवडीमोल भाव, शेतकरी संतापला अन् ३०० किंटल| कांद्यावर जेसीबी फिरवला
Sultanpur Farmer Turned Jcb On Onion चांगलं उत्पन्न मिळेल यासाठी शेतामध्ये कांदा उत्पादन घेतलं होतं. यासाठी वाटेल तेवढा पैसा लावला.
छत्रपती संभाजीनगर: एक लाख रुपये खर्च करून दोन एकर शेतामध्ये कांद्याचे पीक घेतलं. अवकाळीने नुकसान केलं आणि पीक काढणीला आल्यानंतर तीन रुपये किलो भाव मिळाला. संतापलेल्या शेतक-याने ३०० किंटल कांद्यावर जेसीबी फिरवता ही धक्कादायक बाब जिल्ह्यातील सुलतानपूर शिवारातील उघडकीस आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या ऋतुचक्रात झालेले बदल आणि हवामानात होणारे चढ-उतार यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अशातच हातात तोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने हिरावून नेले. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. राज्य सरकारकडून नुकसानीच्या भरपाईचा मोबदला अद्यापही मिळाला नाही. शेतकरी या चिंतेत असताना आता एक धक्कादायक बाब घडली Sultanpur Farmer Turned Jcb On Onion
पहा येथे संपूर्ण व्हिडिओ
छत्रपती संभाजीनगर शहरातील सुलतानपूर शिवारात राहणारे किशोर वेताळ यांनी काही दिवसांपूर्वी एक लाख रुपये खर्च करून दोन एकरामध्ये कांदा पीक घेतलं. कांद्याची लागवड केल्यानंतर अवकाळी पावसाने झोडपलं आणि यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं. या संकटातून सावरून आता काही दिवसांपूर्वी किशोर वेताळ यांनी कांद्याचे काढणी केली. यासाठी मजुरांना त्यांनी पुन्हा २८६ रुपये पद. वीस हजार रुपये खर्च केले. अवकाळी पावसामुळे झालेल्या क शेतकऱ्यांना नुकसानीनंतर किमान लावलेले पेसा तरी निघावे या आशेने किशोर वेताळ यांनी मजूर लावून कांद्याची काढणी केली. मात्र काढलेला मुक्ती गरजेचीच कांदा बाजारामध्ये फक्त तीन रुपये किलोने मागणी केली जाऊ लागला. यामुळे संतापलेल्या किशोर वेताळ यांनी ३०० किल कायावरती जेसीबी फिरवला.