पुणे जिल्ह्यात नवीन आजाराचा उद्रेक, आरोग्य यंत्रणेची धावपळ, शाळा बंद करण्याचा प्रस्ताव
Pune News: पुणे जिल्ह्यात शाळकरी मुलांमध्ये आजाराची नवीन साथ आली आहे. यामुळे आरोगा यंत्रणेची धावपळ उडली आहे. ही आटोक्यात आली नाही तर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.
पुणे जिल्लागत गेल्या चार दिवसांपासून नवीन आजाराची साथ सुरु झाली आहे. ही साथ गंभीर होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरु झाली आहे. नॅशनल इंस्टीटयूट ऑफ हायरोॉजी आणि जिल्हा शल्य चिकित्सक साथ असलेल्या आनंदीत जाणार आहे. तसेच ही साथ आटोक्यात आली नाही तर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभाग प्रशासनाला देणार आहे. चारव दिवसात 1500 रुग्ण या साथीचे आढळले आहेत.
कोणती साथ झाली सुरु
पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपालिकेत डोळ्यांची साथ सुरु झाली आहे. आळंदी येथील वारकरी मुलांच्या बुबुळांना त्रास होत आहे. आळंदीतील विविध संस्थानामध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये डोळ्याच्या साथीचा मोठा प्रादुर्भाव गेल्या चार दिवसांपासून सुरु झाला आहे. चार दिवसांत तब्बल 1560 रुग्ण समोर आले आहे. या आजाराचे सोमवारी 450 रुग्ण आढळते. त्यानंतर मंगळवारी संख्या जवळपास दुप्पट वाढत नवे रुग्ण 740 झाली. पुन्हा बुधवारी 210 रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी 160 रुग्ण आढळून आले आहेत.
NIV चे एक पथक जाणार
आळंदीत शाळकरी मुलांमध्ये आलेल्या साथीमुळे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ कायरोलॉजी म्हणजेच NIV चे पथक आणि जिल्हा शल्य चिकित्सक घटनास्थळी जाणार आहे. या ठिकाणी पाहणी करुन निर्णय घेणार आहे. आरोग्य विभागाने या आजाराच पुढील उद्रेक टाळण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.
तर शाळा बंदचा प्रस्ताव
आळंदीमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आणि लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये तपासणी सुरु केली आहे. या ठिकाणी सर्व घरांची तपासणी केली जात आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयात दोन नेत्रतज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मुलांवर उपचार मोफत केले जात | आहेत. आज आढळलेल्या नवीन प्रकरणांची संख्या कमी झाली नाही, तर शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव देणार आहे. यासंदर्भातील रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. परंतु मुलांमध्ये आढळणाऱ्या या साथीमुळे पालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.