How to Charge Your Android Phone Faster स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही? ६ भन्नाट टिप्स, लवकर होईल मोबाईल चार्ज
How to Charge Your Android Phone Faster पावसाळ्यात वारंवार लाईट जाते. यासाठी स्मार्टफोन झटपट चार्ज करण्यासाठी काही टिप्स
सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला स्मार्टफोनची सवय लागली आहे. अनेकांना स्मार्टफोन शिवाय जमत नाही. स्मार्टफोनमुळे अनेक कामं सोपी झाली आहेत. सध्या पावसाळा सुरु आहे. पावसामुळे अनेक भागात सतत लाईट ये जा करत असते. लाईट गेल्यामुळे स्मार्टफोनला चार्ज करणे कठीण होऊन जाते. व लाईट आल्यानंतर मोबाईल फोन झटपट चार्जिंग देखील होत नाही. जर आपला स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी जास्त वेळ घेत असेल तर, या काही टिप्सचा वापर करून पाहा. या टिप्समुळे अवघ्या काही मिनिटात स्मार्टफोन चार्ज होईल (How to Charge Your Android Phone Faster ).
स्मार्टफोन जलद गतीने चार्ज करण्यासाठी टर्बो किंवा वेगवान चार्जरचा वापर करा. यामुळे सामान्य चार्जरच्या तुलनेत या वेगवान चार्जरमुळे स्मार्टफोन लवकर चार्ज होईल.
डार्क मोडचा वापर करा
डार्क मोडला चालू ठेवल्याने फोनची बॅटरी कमी खर्च होते. यामुळे स्मार्ट फोनचे ब्राईटनेस ही नियंत्रणात राहते, ज्यामुळे स्मार्टफोन वेगाने चार्ज होतो. डार्क मोडमध्ये फोनची स्क्रीन आणि अप्लिकेशन डार्क थीममध्ये दिसते. यामुळे बॅटरी कमी खर्च होते.