Viral Memes on Maharashta Politics: RO! Ajit Pawar यांच्या बंडानंतर सोशल मीडियावर मीम्सचं वादळ

Viral Memes on Maharashta Politics: RO! Ajit Pawar यांच्या बंडानंतर सोशल मीडियावर मीम्सचं वादळ

अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंर सोशल मीडियावर मीम्सचं वादळ आलं आहे.सोशल मीडियावर नेटिझन्सनी बरेच मीमा शेअर केले आहेत. राजकीय भूकंपाबद्दल सोशल मीडियावर मजेशीर चर्चा रंगली आहे.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा 4 वर्षांपूर्वीचा पहाटेचा शपथविधी, आताच्या शपथविधीनंतर पुन्हा व्हायरल होतो आहे.

गेले काही दिवस राजकारणात भाकरी चर्चेत होती. ही भाकरी साहेबांनी फिरवताच जाता दादा पिठाचा डबा घेऊन गेले, असे म्हटले जाते आहे.पक्षातून एकएक गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा असा फोटो करून त्यावर सर्व निघून जाणार फक्त उद्धव ठाकरे राहणार, असे लिहिण्यात आलं आहे.सोशल मीडियावर सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेला हा डायलॉग, ज्याला आताच्या राजकीय परिस्थितीचा टच देण्यात आला आहे.

Leave a Comment