Ashadhi Ekadashi : इतिहासात पहिल्यांदाच; विठ्ठल. रखुमाई दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मोठा निर्णय
Ashadhi Ekadasha: आषाढी एकादशी आता सोनावर आलेली असतानाच पंढरपुरात दिवसाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तर सच्चानिकांच्या सोयीसाठी काही महत्वाचे निर्णयले जात आहेत.
Ashadhi Ekadashi : लाखोंच्या संख्येन सध्या वारकरी विविध संतमंडळींच्या पाल्यांच्या सोबतीन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. एक एक टप्पा ओलांडत ही मंडळी विठ्ठलभेटीच्या आणखी नजीक पोहोचताना दिसत आहेत. त्यांच्या या प्रवासाचा शेवटचा टप्पा अतिशय मनमोहक आणि प्रचंड उत्साहाने भारावलेला असेल. याच खास दिवशी जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेता याव] [पासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऐतिहासिक निर्णय
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात येणाऱ्या असंख्य भाविकांना आता सहजपणे विठ्ठलाचं दर्शन घेण्यात येणार आहे. थोडक्यात आषाढी एकादशीच्या दिवशी आता 24 तासही विठूरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे. आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होते. मात्र यावेळी मुखदर्शन बंद असते. पदाच्या वर्षी मात्र पहिल्यांदाच हा मुखदर्शनाचा प्रयोग राबवला जाणार आहे.
हेसुद्धा वाचा : संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल, IMDकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असून यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असतानाही भाविक विठूरायाचं मुखदर्शन घेऊ शकणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच असा एखादा निर्णय घेण्यात आल्यामुळे सध्या सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.