Viral Video : नशेत होती महिला, भारतीय तरुणाने उचलून फ्लॅटवर नेत केला बलात्कार; CCTV फूटेज आलं समोर

Viral Video : नशेत होती महिला, भारतीय तरुणाने उचलून फ्लॅटवर नेत केला बलात्कार; CCTV फूटेज आलं समोर

 

तरुणी मित्रांसोबत नाइट आउटला गेली होती. त्यानंतर नशेत असणाऱ्या तरुणीता भारतीय विद्याध्यनि उचलून फ्लॅटवर नेत बलात्कार केला. या प्रकरणी तरुणाला ६ वर्षे १९ महिने तुरुंगवासाची शिक्षा झालीय.

लंडन, 18 जून : भारतीय वंशाच्या 20 वर्षीय तरुणाला ब्रिटनमध्ये 6 वर्षे आणि 9 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका नशेत असलेल्या तरुणीला फ्लॅटवर नेऊन बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप होता… पोलिसांनी या प्रकरणी पुरावे सादर केले असून त्याच्या आधारे तरुणाला शिक्षा ठोठावण्यात आली. तरुणाने गुन्हा कबूल केला आहे. तसंच एक सीसीटीव्ही फूटेज यासंदर्भात समोर आलं असून तरुण नशेत असलेल्या महिलेला उचलून घेऊन जाताना दिसत आहे.

Pune Crime पोरगी MPSC परीक्षेत राज्यात तिसरी, पण मित्रासोबत गेल्यानंतर भयंकर घटना सत्कारानंतर काय झालं?

याबाबत मिळालेली माहिती अशी की. ब्रिटनमध्ये प्रीत विकल हा शिक्षणानिमित्त राहत होता. साउथ वेल्स पोलिसांनी द्विटरवर म्हटल की, प्रीत विकल नशेत असलेल्या एका तरुणीला उचलून नेत असल्याचं दिसतंय तो कार्डिफ सिटी सेंटरमधून तिला घेऊन जात होता. प्रीतने तरुणीला त्याच्या फ्लॅटवर नेल. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी विकलला ब्रिटिश यंग ऑफेडर्स इन्स्टिट्यूशनने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

साउथ वेल्स पोलिसांनी ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ फूटेज शेअर केलं आहे. यात एक तरुण मुलीला उचलून नेत असल्याचं दिसतंय, कार्डिफ सिटी सेंटर परिसरातला हा व्हिडीओ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय विद्यार्थ्याचे नाव प्रीत विकल असं आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला सहा वर्षे 9 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलीय.

पोलिसांनी सांगितले की, पीडिता या घटनेनंतर झोपू शकली नाही. आरोपी प्रीत विकलशी ओळख झाली तेव्हा मित्रांसोबत ती नाइट आऊटला गेली होती. घरी जायला निघाली तेव्हा ती मित्रांसोबत नव्हती. त्यानंतर प्रीत विकलने उचलून नेलं. हा प्रकार किंग एडवर्ड सेव्हन एव्हेन्यू आणि नॉर्थ रोडवर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला.

Leave a Comment