कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज 2023 | Kusum Solar Pump Yojana Online Application Registration 2023

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज 2023 | Kusum Solar Pump Yojana Online Application Registration 2023

Maharashtra Kusum Solar Yojana Application Form | How to apply For Kusum Solar Yojana Online Maharashtra | महाराष्ट्र कुसुम सोलर योजना ऑनलाईन अर्ज | कुसुम सोलर योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन कुसुम सोलारपंप योजना संपूर्ण माहिती

महाराष्ट्रामध्ये कुसुम सोलरपंप योजना चालू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर उर्जेवर चालणाऱ्या मोटारीचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना वेळी-अवेळी शेतीतील पिकासाठी पाणी देता यावे, त्यामुळे केंद्र सरकार व राज्यशासनामार्फत पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे जे इंजिन आहेत त्यांचे रुपांतर आता सौरउर्जेवर चालणान्या सौरपंपामध्ये होणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना एकाच पम्पामध्ये दोन फायदे होणार आहेत, एक म्हणजे वीजनिर्मिती आणि दुसरे म्हणजे पिकांसाठी सिंचन सुविधा, तर आजच्या लेखामध्ये आपण कुर्सी सोलार पंप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता, योजनेचे उद्देश आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

कुसुम सोलर पंप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे (Kusum Solar Yojana Documents)

 • ७/१२ उतारा आणि ८अ उतारा (विहीर किंवा कुंपनलिका शेतात असल्यास त्याची ७/१२ उताऱ्यावर
 • नोंद असणे आवश्यक. • ७/१२ उतान्यावर एकपेक्षा जास्त नावे असतील तर भोगवटदराचे नाहरकत प्रमाणपत्र रु. २००/- च्या
 • बाँडवर लागेल.
 • आधारकार्ड झेरॉक्स प्रत
 • रद्द केलेला बँक चेक किंवा बँक पासबुक प्रत
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

अनुसूचित जाती / जमातीचे / इतर मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र. शेतजमीन / विहीर / पाण्याचा पंप सामायिक असेल तर भागीदाराचे नाहरकत प्रतिज्ञापत्र

कुसुम सोलर पंप योजनेसाठी आवश्यक पात्रता

 • ज्या शेतकऱ्याकडे वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल किंवा बारामाही वाहणारे नदीचे पाणी शेताच्या शेजारी असेल तर ते शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार. शेतकऱ्याकडे शाश्वत म्हणजेच कायमस्वरूपी पाण्याचा साठा आहे असे शेतकरी पात्र असतील. शेतकरी
 • शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसावी अन्यथा या योजनेसाठी अपात्र ठरतील.
 • २.५ एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यास 3HP क्षमतेचे कृषीपप देण्यात येईल. . २.५ ते ५ एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यास SHP क्षमतेचे कृषीपंप देण्यात येईल.
 • ५ एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या शेतकन्यास 7.5HP क्षमतेचे कृषीपंप देण्यात येईल. शेतकन्यामार्फत पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौरकृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.

How To Apply for Kusum Solar Pump Yojana Online(Kusum Solar Pump Yojana Online Application Registration 2023)

नवीन नोंदणी करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला www.mahaurja.com (महा कृषी ऊर्जाअभियान ) ही वेबसाइट ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपले गाव या योजनेसाठी पात्र आहे का नाही ? ते

पाहण्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या safe village list मध्ये आपल्या गावाचे नाव पहावे लागेल. जर त्या यादीमध्ये आपल्या गावाचे नाव असेल तर डिझेल पंप नाही हा पर्याय निवडून आपण अर्जाची पुढील प्रक्रिया करू शकतो अन्यथा त्या यादीमध्ये आपल्या गावचे नाव नसेल तर आपल्याला पर्याय म्हणून सध्या स्थितीमध्ये आपल्या शेतीच्या सिंचनकामासाठी आपण डिझेलपंपचा वापर करत असल्याचे निदर्शनास आणून त्या ठिकाणी कुसुम सोलार पंप योजनेसाठी अर्ज करू शकतो. अर्ज करतेवेळेस सर्वप्रथम आपल्याला खालील बाबी निवडावे लागतील.

 

 1. आपले राज्य निवडून आपली शेतजमीन असलेला जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर तालुका निवडून गावाचे नाव निवडायचे आहे.
 2.  त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकून, आपल्या जातीचा प्रवर्ग निवडावा लागेल जसे की, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग यापैकी एक पर्याय निवडून पुढील रकान्यातमध्ये आपला ईमेल आयडी टाकावा लागेल.
 3. पुढील स्टेपमध्ये आपल्याला नोंदणीसाठी १००रू / फीस ऑनलाईन भरावी लागेल. 4. फीस भरणा केल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर युजरनेम आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्याआधारे आपल्याला पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील. 5. कागदपत्र अपलोड केल्यानंतर काही दिवसात आपल्याला पेमेंट करण्यासाठी लिंक देण्यात येईल

त्यामध्ये आपण पेमेंट केल्यानंतर पुढील जी प्रक्रिया आहे ती सपूर्ण करण्यात येईल

कुसुम सोलर पंपसाठी अर्ज कसा करावा ?

कुसुम सोलर पंपसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

कुसुम सोलर पंप योजनेसाठी वेबसाइट कोणती आहे ?

https://kusum.mahaurja.com/benef_reg/Kusum-Yojana-Component-BUT वेबसाईटवरती जाऊन तुम्ही नवीन नोंदणी करू शकता.

कुसुम सोलर पंपसाठी कोण-कोणती कागदपत्रे लागतात ?

आमच्या वेबसाइट वरील संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचून घ्या त्यामध्ये लागणारी कागदपत्रे देण्यात आली आहेत.

कुसुम सोलर योजने अंतर्गत किती HP ची मोटर भेटेल ?

शेतकरयांच्या शेतजमिनीनुसार म्हणजे क्षेत्रे जितके असेल त्यानुसार त्यांना 3HP, SHP 7.5HP सोलारचलित मोटर पंप मिळेल.

Leave a Comment