Kolhapur Violance Live | कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनाचं आंदोलन चिघळल: पोलिसांकडून लाठीचार्ज

Kolhapur Violance news | कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनाचं आंदोलन चिघळल: पोलिसांकडून लाठीचार्ज

कोल्हापूर, 07 जून कोल्हापुरात राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आक्षेपार्ह पोस्टनंतर हिंदुत्ववादी कार्यकत्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही केले. दरम्यान, कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली.Kolhapur Violance news

शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमारही केला. तसेच जिल्ह्यात १९ जूनपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाच किंवा त्याहून जास्त लोकांना एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे. याशिवाय जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा, प्रतिमांचे प्रदर्शन, आवेशपूर्ण भाषणे करण्यासही मनाई असणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

दरम्यान, आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकत्यांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.. पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सायंकाळी शहरात बंदसारखी परिस्थिती होती. तर संतप्त जमावाने लक्ष्मीपुरी बाजारात फळ विक्रेत्यांच्या गाड्या उलटल्या तर काही ठिकाणी दगडफेकही केली.Kolhapur Violance news

कोल्हापुरातील समस्त मुस्लिम समाजाकडून एक पत्रक काढून एकोप्याचं आवाहन करण्यात आले आहे. तसंच पोलिसानी अपप्रवृत्तींना वेळीच रोखावं असंही म्हटलं आहे. काही तरुणाच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे कोल्हापुरच्या एकतेला तडा गेल्यासारखं वातावरण तयार झालंय, पोलिसांनी अशा समाजकंटकांना वेळीच ठेचावं आणि त्यांना कठोर शासन करावं अशी मागणी मुस्लिम समाजाने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment