Rain updates: नेमका मान्सून येणार केव्हा; मान्सूनचे जवळपास 90 टक्के अंदाज चुकले!
नेमका मान्सून येणार केव्हा
मान्सूनचे जवळपास 90 टक्के अंदाज चुकले!!
शेती अन् शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे आणि जिवाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे मान्सून. हा मान्सून ‘आपल्या जिल्ह्यात राज्यात केव्हा येणार म्हणून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. आतापर्यंत भारतीय हवामान खात्यासह खासगी हवामान संस्थां व अभ्यासकांनी जाहिर केलेले मान्सूनचे अंदाज वेळोवेळी म्हणजे जवळपास 90 टक्के चुकले आहेत. आता 18 जून ते 21 जून पर्यंत मान्सून सर्वत्र सक्रीय होईल. 25 जून नंतर मान्सून तिव्र गतीने प्रवेश करेल असा अंदाज बांधला जात आहे.
हवामान खात्यासह अनेक खासगी संस्थांनी चार जून पर्यंत मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तो अंदाज खरा ठराला नाही ते उशिरा झाले. त्याचे कारण चक्रीवादळामुळे मान्सूनची गती कमी झाली. आणि महाराष्ट्रात मान्सून पूर्वपणे पोहचलाच नाही. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाने अति रौद्र रुप धारण केले आहे. त्या वादळाचा अनेक राज्यात धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे अनेक राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. महाराष्ट्रात येत्या 18 ते 21 जून पर्यंत मान्सून सर्वत्र सक्रीय होणार असल्याचा आंदाज व्यक्त केला जात आहे.
पेरणी केव्हा करावी
शेतकरी बांधवांनी महागामोलाची बि-बीयाणे खरेदी केले आहेत. पैसे नसतांना उसणवारी, सावकारांकडून पैसे घेवून बि-बीयाणे आणले आहेत. आत बळीराजा पावसाची वाट पाहत आहे. मात्र महराष्ट्रात मे मध्ये पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक भागात मशागती पूर्ण झाल्या नाहीत. मान्सून वेळेवर आला नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रात येत्या 18 ते 21 जून पर्यंत मान्सून सर्वत्र सक्रीय होणार आहे. शेतकरी बांधवांनो आपल्या शेतात दोन इंच पावसाची ओल गेल्यानंतरच पेरणी करा किंवा 100 मि.मि. पाऊस झाल्यावर दुबार पेरणी आता परवडणारी नाही. कारण पहिलीच पेरणी 15 जून आला तरीही झालेलेली नाही. मित्रांनो हा अंदाज आहे. वातावरणात बदल झाला तर अंदाज चुकत आहे.
पाऊस लांबला तर…..
शेतकरी मित्रांनो यदा मे महिन्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे येत्या काळातही पाऊस लांबण्याची शक्यता आहे. जर पाऊस लांबला तर मूग व उडीद ही पिके टाळावी अन सोयाबीन, व तुर या पिकांची लागवड फायदेशीर ठरु शकते.
पंजाबराव डख सर हे हवामान अभ्यासक आहेत. शेतकरी बांधवांचा डख सरांच्या हवामान अंदाजावर गाढा विश्वास आहे. त्यांनी व्यक्त केलेला प्रत्यक अंदाज आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहच करत आहोत.