Pikachu jet arrived Delhi airport भारतात दाखल झालं Pikachu Jet! दिल्लीत झालं आगमन; जाणून घ्या या विशेष विमानाबद्दल
Pikachu Jet Arrived Delhi Airport या विमानाचा फोटो एका राजदुतांनीच शेअर केला असून या फोटोला शेकडोंच्या संखोन लाईक्स आणि रोजर्स मिळाले आहेत. हे विमान दिल्लीत दाखल होण्यामागे एक विशेष कारण असून विमानाची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे
Pikachu Jet Arrived In Delhi: भारतामधील जपानचे राजदूत हिरोशी सुजुकी पांनी पोकेमॉन थीमच्या बोइंग 787- विमानासंदर्भात केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक भारतीयांचं लक्ष या पोस्टने वेधून घेतलं आहे. हिरोशी सुजुकी यांनी जपानच्या ऑल निप्पॉन एअरवेजच्या (एएनए) स्पेशल विमानाचा फोटो शेअर केला आहे. या कंपनीने नुकतेच आपल्या या खास विमानाचं उद्घाटन केल. या विमानावर पोकेमॉन या प्रसिद्ध जपानी कार्टून सिरीजमधील पोकेमॉन रेखाटण्यात आले आहेत सोशल मीडियावर शेअर केलेला हा विमानाचा फोटो अनेकांच्या पसंतीत पडला आहे.
काय आहे या विमानावर ?
पिकाचू जेटच्या बाहेरील बाजूस अनेक कार्टून कैरेक्टर्सची चित्र काढण्यात आली आहे. यामध्ये हिरव्या, भगव्या पिवळ्या, निळ्या रंगात वेगवेगळ्या पोकेमॉनची चित्र काढण्यात आली आहेत. विमानाच्या पंख्यावर पोकेबॉलचं चित्र काढण्यात आलेल आहे. या विमानाच्या आतील भागातही पिकाचू धिम असल्याचं सांगितलं जात आहे..
अनेकांना आठवलं बालपण
या विमानाचा फोटो पाहून अनेकांना आपलं बालपण आठवलं आहे. ही पोस्ट पोकेमॉनच्या चाहत्यांना फारच आवडली आहे. या पोस्टला एका लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडोच्या संख्येन या पोस्टला रिट्रीट आणि शेअर्स मिळाले. आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करून हे विमान फारच छान दिसत असल्याचं म्हटलं आहे. बऱ्याच जणांनी या विमानावरील कलाकारी लक्ष वेधून घेणारी आणि फारच आकर्षक असल्याचं म्हटलं आहे. 1990 च्या दशकामधील अनेकांनी हे विमान पाहून आपलं बालपण आठवल्याची भावना व्यक्त केली आहे. बऱ्याच जणांनी आपल्या बालपणीच्या सर्वात लोकप्रिय कॅरेक्टरला अशाप्रकारे थेट विमानावर स्थान दिल्याबद्दल या जपानी कंपनीचे आभार मानले आहेत.
काय म्हटलं आहे जपानच्या राजदुतांनी?
“भारतामध्ये पिकाचूचे स्वागत आहे. एएनएच्या या पिकाचू जेटने पहिल्यांदाच दिल्लीसाठी उड्डाण केल्याचं पाहून फार आनंद झाला. हे विमान आता दिल्लीच्या आकाशात चकाकण्यासाठी तयार आहे,” अशी कॅप्शन हिरोशी सुजुकी यानी या फोटोला दिली आहे. विमानाचं मुख्य आकर्षण हे त्याचे नाव आहे. या विमानाचे नाव पिकाचू असं ठेवण्यात आले आहे पोकेमॉन सिरीजमधील लोकप्रिय कॅरेक्टर असेला पिकाचू हा एखाद्या मोठ्या आकाराच्या उंदराप्रमाणे दिसणारा काल्पनिक प्राणी आहे जगातील सर्वात लोकप्रिय कार्टून कॅरेक्टरमध्ये पिकाचूचा समावेश होता.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा